Wednesday 15 July 2020

घर

घर

मुंबई सोडतीये.....
पहिलंच shifting नाहीये तसं हे
पण तरी कुठेतरी काहीतरी आत अस हलतच ना
जुन्याचा comfort zone आणि नव्याच new normal दोन्ही खुणावत असतात....
मी राहुल ला म्हणाले ह्या क्षणा जवळ जरा थांबू दे मला
मनातली होणारी कालवाकालव , अस्थिरता ... रेंगाळू दे जरा
जाणिवा बोथट होऊ नयेत कधी.
एवढ्या साऱ्या आठवणी, कित्ती सुंदर दिवस, नुसता कधी वेडगळ पणा, राग, हट्ट, अधीरता, समाधान सगळं सगळं
आपल्या सोबत ह्या घरा ने पण पाहिलंय ....
ह्याला सोडताना ची घालमेल मला हविये,
माझं किती प्रेम होत ह्या सगळ्यावर हे कळू दे माझं मला
तुला सोडायचंय आता हे म्हणताना डोळ्यातून जेंव्हा पाणी आलं आणि मी म्हणाले thank you
तेंव्हा ही वास्तू म्हणाली तथास्तु.....
आणि अत्यंत सावकाशपणे मी निरोप घेतला
चला निघते
आपण पुन्हा भेटुयात...


Monday 10 September 2018

बायकी इगो

घटना साधी होती . एक जोडपं असत मुंबई मध्ये .. एक ५ वर्षाची मुलगी असते दोघांना .. काही दिवसांनी  बायको पुन्हा प्रेग्नन्ट असते. सगळं सुरळीत चालू असत. होत काय तर, गावाकडे दाखवायला गेले असताना डॉक्टर रिपोर्ट्स बघून बायकोला रेस्ट घ्यायला सांगतात. सगळे ठरवतात कि आता बायकोने सासरी राहायचं बस. बायकgो ला घरून काम करायची परवानगी मिळते आणि किमान १ आठवडा तरी ती घरून काम करायला तयार होते , राहिला मुलीचा प्रश्न , नवरा म्हणतो मी घेऊन जातो तिला, कसे बसे ५ दिवसांसाठी नवरा सगळं सांभाळेल म्हणून तीही तयार होते . तिची शाळा आणि हीच काम दोन्ही पार पडेल ह्या अर्थाने.

बायकोची प्रकृती ठीक होते परत मुंबईला ते येतात .

ह्यात बायको दुसरी कुणी नसून मीच आहे . आल्यानंतर किंवा तिथेच असताना ज्या काही कंमेंट्स मिळाल्या ... त्या साठी हा लेख प्रपंच ...

सगळ्यांनी माझ्या नवऱ्याला राहुल ला खूप appreciate  केलं . कसं  केलस सगळं , खरंच ग्रेट , रडली नाही का  वैगरे . मी सुद्धा माझ्या नवऱ्याचं खूप कौतुक करते आणि केलं , तो वेळेवर येत राहिला , मुलीला पाळणाघरातून वेळेत आणलं पूर्ण ५ दिवस. त्याच ऑफिस वर्क किती affect  झालं मला नाही माहित. पण भाजी करणे आणि कुकर लावणे , मुलीचा डब्बा भरणे , तयार करणे (तसाही सध्या हे काम त्याच्याकडेच आहे ) तिला शाळेत सोडणे  सगळं छान  केलं .

मला तसाही वाटत दोघे working  असतील तर नवऱ्याने घरकामात हातभार लावणे काही नवीन नाही . किंवा हातभार लावलाच पाहिजे . वेळ आणि सोय दोन्ही ची कमतरता असते .

परवा  असेच एका ठिकाणी गेलो होतो . म्हणाल तर तसे ते नवरा बायको working . माझी बहीण या नात्याने मी तिला बोलायचे आणि तीही बऱ्याच वेळा माझ्या मदतीला धावून आली होती ...
तिने मला सर्वप्रथम भरपूर रागावले आणि इन्सिस्ट केले कि तब्बेतीची काळजी घे आणि घरूनच काम कर. मला खूप बरे वाटले , कि कुणीतरी इतक्या काळजीपोटी बोलतीये .. नंतर म्हणाली कि तुझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घे ... I  रिअली surprised .. असो नंतर राहुल ला म्हणाली कि मला तुला फोन  करायला लाज वाटली .. कि कसा तू एकटा manage करत असशील ...
ह्यात लाज कसली वाटायला पाहिजे ? हाकेच्या अंतरावर राहते जर खरंच तळमळ वाटत असती तर कधी  जेवायला बोलावलं असत ... किंवा मुली सोबत खेळायला आली असती . आता खरं तर तीही working  वूमन आहे सो मला तशी खरंच अपेक्षा नाही पण लाज कसली वाटली ?

तसाही मी तमाम बायका वर्ग जो नवऱ्याला काहीच करू देत नाही फक्त त्याच स्वतःच ढुंगण धुणं  सोडल्यास .. अश्या बायकांचे कंमेंट्स तर मी इकडून ऐकून तिकडून सोडून दिलेच आहेत पण एक मुंबई मधली working  वूमन जी स्वतः १२ तास काम करते तिचा नवरा सुद्धा तिच्या मुलींकडे बघतो , सांभाळतो (now  I doubt ) तिने असे म्हणावे .... ?

डोक्याचा भुगा झाला विचार करून ... काय नेमकं चाललंय किंवा का नेहमी कामाचा संबंध gender शी लावला जातो ?
काही कामे खरंच वाटून घेतली तर काय होत? जेंव्हा बाई कामासाठी घराबाहेर पडते ते accept केलाच न , त्यात काय एवढं असं म्हणून ... त्याच पद्धतीने एका पुरुषाने त्याच लेकरू मी समर्थ पणे  सांभाळू शकतो असं म्हणतो तर का नाही म्हणायचं , त्यात काय एवढं ??
माझ्या बऱ्याच मैत्रिणी सुद्धा राहुल च कौतुक करतात ... पण मला एकही राहुल चा मित्र किंवा माझा मित्र असा नाही भेटला जो म्हणेल कि ग्रेट यार तू काम करतेस , चांगलं कमावतेस .... का नाही ?

मला निसर्गाचा नियम माहित आहे कि काही कामे फक्त बायकांनी करावीत , मुलांना जन्म देणे , मन लावून स्वयंपाक करणे, बायका multitasking असतात. मला मान्य आहे . पण पुरुषांना जर करावंस वाटत असेन तर का नाही स्वयंपाकात मदत करू द्यायची ? का नाही मुलांना सांभाळू द्यायचं ? वेळही असतो तेंव्हा.

हे जे कुणी पुरुषांना करू देत नसेल अर्थात त्यांची इच्छा असल्यास .. तर मी त्याला बायकी इगो म्हणेन ... संसारात काय जो काम करतो त्यालाच महत्व का ? आणि जर बायकांची कामे पुरुष सहज करू लागले तर बायकांना मोठेपणा गाजवायला साधन कुठलं राहणार नाही का ? आपलं क्रेडिट दुसऱ्या कुणाला कशाला द्यायचं ?  नाही का ?

मला क्रेडिट नकोच आहे पण मला guilt देऊ नका  एवढ माझं म्हणणं .

मुळात घरकाम किंवा स्वतःच काम करणे याचा डायरेक्ट संबंध मी स्वावलंबनाशी लावते. कुणाचं काही अडू नये म्हणून.
मला सुद्धा ४ गोष्टी यायलाच हव्यात जसेकी कार चालवणे, बल्ब बदलणे ... (मला अजून specific to  पुरुष अशी कामे सुचेचनात)
हीच बाब सर्वांसाठी सामान असायला हवी.

मी काही आळशी नाही , आणि मी नुसती बसून ए चल चहा टाक  रे असं म्हणणारी नाही. सोई  नुसार गरज पडल्यास नवऱ्याची मदत accept करणारी आहे . यात माझं बाईपण अज्जीबात कमी होत असं मला वाटत नाही तसेच माझ्या नवऱ्याचा पुरुषार्थ तसूभरही कमी होणार नाही

कालच Ki and Ka  पहिला. शेवटी जया बच्चन च पत्र सगळं सांगून जात. Ka मोठा झाला कारण Ki ने त्याला accept केलं. घर सांभाळणारा नवरा हे कुठली स्त्री सहज नाही स्वीकारू शकत.. ह्यासाठी सुद्धा खूप हिम्मत लागते ...

खरंच नाही का ?



Sunday 23 August 2015

मळभ

सकाळ झाली ती उठली स्वच्छ सूर्याच दर्शन तिने घेतल।  पहाट  प्रसन्नच होती।
दूर कुठेतरी एकटक बघत तिने चहा संपवला।
चहा चा कप सिंक मधे ठेवला आणि एक निर्धाराने तिने कामाला सुरवात केलि
स्वच्छ अंघोळ केली। . देवपूजा केली। .. तांब्याची भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवली
स्वंयपाक केला। … किचन ओटा पुसून घेतला
भांडी जागच्या जागी  मांडून ठेवली
बेडरूम मधले अस्तव्यस्त कपडे घडी करून कप्प्यात ठेवले
हॉल मधली फ्रेम थोड़ी डाव्या बाजूला कलली होती। .... ती  सरळ केली

इतक करूनही मन लागेना
आरश्यात पाहिल। । सगळ  घर घासून पुसून स्वछ होत पण तरी काहीतरी रहिलय अस सारख वाटत होत
जाणवल मन शांत नहिये.

Saturday 11 April 2015

The Kid

परवा एका पेपर मधे वाचाल की एक मुलीने लग्नासाठी बायोडाटा तयार केला आणि त्यात लिहिले "I  want somebody who hate kids " माला वाचून  थोडस आशर्य वाटल , जर हिच्या आई बाबांनी हाच विचार केला असता तर हे kid जन्माला आल असत का?
लग्न म्हणजे फ़क्त मूल ,संसार ह्यासाठीच ह्या मताची मी  पण नहिये। ।
लग्न म्हणजे एक promis , एक सोबत आणि असंख्य नवी नाती। ..
लग्न केल्यानंतर जे couple  बरसच mutual असेल तर नात्यात एक ठहराव यायला फार वेळ लागत नहीं।
सुरवतीची कही वादळ संपली की एकमेकांची सोबत खुप सुख देऊन जाते।
मी  गम्मत म्हणून नवर्याला उगाच हाक मारते। । किचन मधून तो  हॉल मधे  असेल तेंव्हा , गाडीवर मी मागे तो पुढे असेल … अस कधीही … माझ्या हाकेला 'ओ' देणार कुणीतरी आहे हे feeling कसलं निराळ सुख देऊन जात …
एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतरजशा जबाबदार्या येतात तसा हक्कही आलाच न … पण प्रेमळ हक्क …
माझ अस बरेचदा व्हायचं … तुझ जे आहे ते माझ, मग कधी नवर्याचा T shirt घाल कधी headphone palav अस काहीही मी करायचे …. आपण नाही का आई बहिणी सगळ्या वस्तू share करतो …
एके दिवशी संध्याकाळी गप्पा मारत होतो , मी नवर्याला म्हणाले "तुझ नाक किती सरळ आणि गोंडस आहे "
तो हि गमतीने म्हणाला "हा हा पण मी नाही देणार तुला "
मी म्हणाले " तू दिलास ते कधीच माझ्या लेकीला …। "
….
आम्ही दोघेही गालातल्या गालात हसू लागलो … आजूबाजूला बागडणार्या माझ्या लेकीला बघत बसलो .
आम्ही तिघेही एक असल्याचा भास व्हायला लागला मला …
अस वाटल त्या मोठ्या झालेल्या kid च्या जीवनात ला हे सुखाचे क्षण येतील का ?

Thursday 27 June 2013

Updated Version

परवाच वट पोर्णिमा होउन गेली ...
मला न या उत्सव बद्दल एक कुतूहल आहे . खुप अधिपासून .
लहानपणी फ़क्त आईला मदत म्हणून ते पूजेच ता ट  पकडायला जायचे . तिच्या फेरया होई तोवर आजुबाजुच्या बायकांना बघत बसायला खुप गम्मत वाटायची। इतकी अलोट गर्दी , त्यात प्रत्येक जन अगदी नटून थटून यायची . ते दोर्याच रीळ घेउन फिरायच्या आपल्या वडा भोवती .
खात्री म्हणून इतक्या गच्च अवळ नार दोरया ... बर ते वडाच झाड़ आहे चाफ्याच असत तर खोडा पासून उन्मलुन पडल अस्त बिचार .
नथ सावरत कसबस सात फेरया मारणार , अणि हुशश करत एक मोठा कार्यक्रम पर पडला अस म्हणत निघून जाणार .

आपल्यावर वेळ येइल तेंव्हा आपण यापैकी कोण असू हा विचार सुद्धा मनात आला नव्हता .
पण लवकरच ती  वेळ आली . माझ्या पूर्व जान्मिची पुण्याई असेन ,माझ्या सासरी ह्या दिवशी उपास वैगरे नस्तो. (असता  तर मी किती प्रमाणिक पने केला असता हाही प्रश्नच आहे)
आई म्हणतील तशी पूजा वैगरे करून झाली ... पण एकच प्रश्न डोक्यात ... अरे यार हाच नवरा मिळाला तर चालेल का ? मग मी माझी प्रार्थानाच बदलली
" देवा, हाच पति मिळावा but with updated versions..."

खरच  अस झाल तर  ... चला ऐकुयात वट पोर्णिमा ची updated कहाणी

एक आटपाट नगर होत। सगले लोक गुण्य गोविंदाने राहत  होते। कुबेराचे राज्य वाटावे अशी धनवान व्यापारी अणि जनता होती . कहिहि आपत्ति आली की लोक देवाचा धावा करायचे अणि सकंट talayche .
त्या नगरात एक चिमन राव अणि गणपत राव असे २ महा हुशार व्यापारी होते. निरनिराल्या देशात जाऊन ते वेगवेगल्या वस्तु विशेष करून महिला वर्गाला मोहविनारया वस्तुंचा ते व्यापर करत. 

 वट पोर्णिमा सारखा दिवस याला अपवाद कस असेन ...? आदल्या दिवशी ह्या व्यापारी कड़े बायकांची गर्दी असायची कारन त्यांच्याकडे एक सात पदरी दोरा (रीळ ) मिलायचे .
तो दोरा घेउन जी बाई वडाला फेर्या मारेन तिला तिचा नवरा हवा तसा मिळणार होता . बर्याच बायकांना ह्याच जन्मी फरक जाणवत होता .
त्या दोर्याच वारंटी कार्ड होत त्यात त्याचे pros n cons असे होते 
१. नवरा तोच असेंन पण version नेक्स्ट असेन 
२. प्रत्येक वर्षी ह्याच companycha दोरा घेतला तरच फायदा होइल 
३. अति हाव करत २-४ फेर्या जास्त मारायच्या नाहीत परिणाम उलट होउ शकतो 
४. ह्या वर्षी घेतलेला दोरा ह्याच वर्षी वापरायचा Exp डेट - within १ डे 
वैगरे वैगरे 

सगले सुरलीत  पर पडायचे पण 
काही कारण झाले अणि चिमन राव ,गनपत राव यांचे भांडण झाले . चिमन राव यानि गनपत राव यांना धन्द्यातुन काढून टाकले . 
गनपत राव यांनी होत्या तेवढ्या उत्पन्न तुन नविन दुकान थातले .
 त्याना  वट पोर्णिमा ची नवीन आईडिया सुचली। त्यांनी अजुन एडवांस दोरा अनला . त्यांच्या मते आता हा दोरा जो कोणी वापरेन तो version नहीं तर नवरा देखिल बदलू शकेन ,किती जन्म सोबत हवी हे देखिल ठरवू  शकेन .इतकच  काय तर नकोच असेन कुणी तर ह्यासाठी सुद्धा दोरा  available होता .
प्रथम बायका ने विरोध केला पण फायदे बघून सगळा महिला वर्ग गनपत राव च्या दुकनत. 
सर्व बायका खुश। कुणाच्या हातात २ जन्माचा दोरा दिसायचा .. कुणी १ जन्म , कुणी ४ . फारच छान नवरा असेन तर जास्तीत जास्त ५ जन्माचा दोरा असायचा। पुढे पुढे कुणी ७ जन्माचा दोरा मागितला तर ती बाई gavandhal समजली जायची .कुणी "नवरा नकोच" असा दोरा घेउन गेली तर ती खुप मॉडर्न बाई असायची .
या सगळ्यांचा परिणाम नवरा बायकोचे bhandan वाढले , नवरे लोक दोरा कुठला anla यावर नजर ठेऊ लागले .
कुणी १ जन्माचा दोरा  घेतल्यास "हाही जन्म नको" म्हणून घटस्फोट घेउ लागली "

हा गोंधळ पाहून देवालाच प्रकट व्हावे लागले . त्याने सगल्या दोर्यतली पॉवर संपून टाकली अणि म्हणाला 
" असे सगले उपास तापस करून , फेर्या मारून तुमची कामे सोपी केलि तर  तुम्ही त्याचा गैर फायदा घेतला "
आता यापुढे कोणीही हे सगले करून नवरा बुक करून ठेउ शकणार नहीं . ह्या जन्माची फले याच जन्मी भोगावी लागतील "
गनपत राव हे सगल खोट आहे असेच भास्वत राहिले .. अनेक बायका रितिप्रमाने दोरे  घेउन फेर्या मारताना दिसायच्या ... हे चालूच राहिले .
तर  एकीकडे कही हुशार बायका यापासून बोध घेउन ... याच जन्मीचा संसार कसा सुखी करता येइल यासाठी प्रयत्न करू लागल्या .
सर्वांना त्यांच्या कृतिची फले मिलु लागली ....

शेवटी समझनेवाले समझ गये .... और जो न समझे ........ :) :) :) 



Sunday 16 June 2013

एक होता गहू

पूर्वीच्या बायका किती हुशार होत्या अस माला नेहमी वाटायच . शिकलेल्या नसुनहि असंख्य गाणी म्हानायच्या , चुल अणि मूल इतकाच विश्व असुनही त्याचा पसारा अनंत होता .
कालच 'भेदिले surya  मंडला ' ही श्री रविन्द्र भट यांची कादंबरी हातात घेतली , समर्थ रामदास चरित्र असा ह्या कादंबरीचा विषय आहे . त्यात एक सुंदर सोप्प गाण वाचनात आल . नारायण (श्री समर्थ) च्या वाहिनी व आई
लग्नाचे गव्हाले करायला घेतात तेंव्हा वाहिनी पार्वती यांच ते  सुरेख गाण

"जाते फिरू लागले ,खाली  शुभ्र पीठ पडू लागले , पार्वती गुनगुनु लागली "

"एक होता गहू त्याचे गव्हाले केले सात 
जाऊ बाई धरून ठेवा भा उ जींचा  हात ॥ 
एका हरबर्याचे वाटले वाटीभर पूरण 
१ ० ०  जन जेवली तरी उरलाच वरण ॥ 
एका तान्दुलाचा केला टोप्लाभर भात 
सारी पंगत उठली तरी भा उ जीं बसले खात ॥ 
एका मसुरचि झाली हंडा भर उसळ 
भा उ जीं आले बद्वायला घेउन मुसळ ॥ 
एका कैरी चिरली केल लोणच छान 
भा उ जीं म्हणतात झालय अं बट  ढा ण ॥ 
एक मोती केल्या त्याच्या मुंड वल्या  छान 
भा उ जीं च्या हाती  दिल्या मोत्यांचा हार ॥ 
जाऊ बाई हार  नीट कुलुपात ठेवा 
वैभव चा  गावकरी करतील हेवा ॥ 
सासुबाई माया त्यांची साईं वाणी 
आशीर्वाद सदा लाभे आइवणी ॥ 

एक होता गहू त्याचे गव्हाले केले सात 
जाऊ बाई धरून ठेवा भा उ जींचा  हात ॥ 



Wednesday 5 June 2013

माझे विचार ....

माझे विचार .... :)

लहानपणी  शाळेत सर्वचजन सुविचार ऐकत,वाचत,लिहित मोठे झालो . सुविचारांचा वापर कधी बोलण्यात, भाषण करण्यात वैगरे केला .
पुढे स्वताचे असे कही विचार डोक्यात घुमु लागले . त्याला मी माझे सुविचार न म्हणता नुसतेच विचार म्हणेन ...
त्यापैकी काही पुढील प्रमाणे

१ . जर तुम्ही समोरच्या चा  मूड संभालू शकत नसाल तर तो बिघडव न्याचा तुम्हाला अधिकार नाही
२ . जोवर तुम्ही एखाद्या कामात परफेक्ट होत  नाही तोवर तुम्हाला त्या कामाचा कं टा ळा येउ शकत नाही

आज दोनच पुरे .. :)