Friday 17 May 2013

वेड लागलाय …


आज् खूपच कसतरी होतय… Infact काल संध्याकाळपासुनच ..अगदी वेड वेड  होतंय … आत्ता थोडेसे असावे डोळ्यातून बाहेर पडलेच एकदाचे 

नवरा ऑफिस ला जाताना त्याला विचारावस वाटत होत 'मी आजारी असताना थांब म्हणत नाही रे पण आज माझ 'मन' आजारी पडलंय , दुखतंय जर कुठेतरी , थांबतोस का?' आणि उत्तर नाहीच येणार हे माहित होत । त्याने जाताना दार लावलं आणि इकडे टिपूस टिपूस पाणी झर झर। 

कस असत न आपलं , आपल्याला नेमक काय हव असत अशा वेळी …?. कधी कधी तर मी नुसत शांत बसून ती वेळ जाऊ देण्याची वाट बघत बसते 
सारखे सारखे मन मला प्रश्न विचारात होत. कधी सिक्सर तर कधी नो बॉल अस म्हणत मी खेळत  होते 
काल नवरा दिसला त्याला म्हणाले थकलेय रे । तर कधीच कधीच तो म्हणणारा नसतो physicaly का …. मेंटली ? पण तरी माझी अपेक्षा । कधीतरी विचारअव …. 
Infact सगळा बाहेरचा राग , त्रागा , किट किट कुनाच्या माथ्यावर आदळणार ? तर लग्न  लावून दिलंय  न माय  बापाने … दिलंय न हक्काच  डोकं तर फोडा सगळ त्यावर …. हे अस चाल्ल होत माझ 
तुला कधीच समजणार नाही हे शंभरदा  म्हणून झाल तरी माझी भूक कायम . 
सगळे मनाचे खेळ भाव भावना एक स्त्री म्हणून फक्त मलाच दिल्यात ह्या थाटात वावरत होते मी 
बरोबर नाही का ते एका अर्थान  
विचार करणे, घडलेल्या गोष्टीचं,भेटणाऱ्या लोकांचे मनावर पडसाद उमटण । आत कुठेतरी खोल काहीतरी हलण…. अगदी आजूबाजूची हवा बदलण्याचा परिणाम होन हे नकोय का व्हायला …। 
आज काय तर भाजीच खराब झाली किंवा छान झाली , मधेच काय तर ड्रेस आवडला नाही , मनासारखी बांगडी मिळाली नाही , घरात खूप पसारा पडलाय , इतकाच काय तर रस्त्यात कुणीतरी पचकन थुंकल हे साध कारण पुरे असत 
आणि ह्यावर आपण दुसर्या कुणाच तरी उत्तर शोधत  असतो । काय करत असतो ईश्वरालाच ठाऊक 
माझ बरेचदा मनाला रागवण सुरु होऊन जात …. असे विचार बंद कर , चाल इकडे काम कर वेगरे  वेगरे …। 
पण तो काय रुमाल असतो घातली घडी छान  कि आपसूकपणे छान  कप्प्यात बसायला ……। 
आणि म कामाची list उडत उडत येते आणि घड्याळ आपल्याकडे हसत भागात असत । काय madam , बघा माझ्याकडे वाजले किती … रोज मला हरवता न आज तुम्ही हरलात मी पुढे पळतोय . रोज local साठी १० min अगोदर पोचते तेंव्हा घड्याळाकडे  बोट दाखवते आणि म्हणत असते ,  बघ बघ मी जिंकले माझे ९ तुझ्यापेक्षा लवकर वज्लेत। हरलास तू . 
झाली इथे सगळे मनाचे खेळ संपतात …शहाण्यासारखं आपण त्याला खाली ठेवतो नाहीतर गेलास चुलीत म्हणून फेकून देतो आणि दोन हात दोन पाय दोन डोळे असा सगळ एक धड लागत पळायला
सगळी काम होऊन शांतापे compnyt जाऊन log  इन करतो , कालच्या इतकेच वाजले असतात , मी सहज विचार करते काय फरक आहे कालच्या ९ . २ ७ आणि आजच्या ९ . २ ७ मध्ये । म आठवत हो आज काहीतरी बिनसलं होत आपल 
म साहेबा मनाची आठवण येते । तर ते आपल्या मागे लुटू लुटू धावत असत ,दुसरा पर्याय असतो का आपण ठेवलेला 
आपण हसतो … गण गुण गुणत facebook ला लॉग इन होतो ……… 
इति कहाणी सुफळ संपूर्ण 


2 comments: