Monday 10 September 2018

बायकी इगो

घटना साधी होती . एक जोडपं असत मुंबई मध्ये .. एक ५ वर्षाची मुलगी असते दोघांना .. काही दिवसांनी  बायको पुन्हा प्रेग्नन्ट असते. सगळं सुरळीत चालू असत. होत काय तर, गावाकडे दाखवायला गेले असताना डॉक्टर रिपोर्ट्स बघून बायकोला रेस्ट घ्यायला सांगतात. सगळे ठरवतात कि आता बायकोने सासरी राहायचं बस. बायकgो ला घरून काम करायची परवानगी मिळते आणि किमान १ आठवडा तरी ती घरून काम करायला तयार होते , राहिला मुलीचा प्रश्न , नवरा म्हणतो मी घेऊन जातो तिला, कसे बसे ५ दिवसांसाठी नवरा सगळं सांभाळेल म्हणून तीही तयार होते . तिची शाळा आणि हीच काम दोन्ही पार पडेल ह्या अर्थाने.

बायकोची प्रकृती ठीक होते परत मुंबईला ते येतात .

ह्यात बायको दुसरी कुणी नसून मीच आहे . आल्यानंतर किंवा तिथेच असताना ज्या काही कंमेंट्स मिळाल्या ... त्या साठी हा लेख प्रपंच ...

सगळ्यांनी माझ्या नवऱ्याला राहुल ला खूप appreciate  केलं . कसं  केलस सगळं , खरंच ग्रेट , रडली नाही का  वैगरे . मी सुद्धा माझ्या नवऱ्याचं खूप कौतुक करते आणि केलं , तो वेळेवर येत राहिला , मुलीला पाळणाघरातून वेळेत आणलं पूर्ण ५ दिवस. त्याच ऑफिस वर्क किती affect  झालं मला नाही माहित. पण भाजी करणे आणि कुकर लावणे , मुलीचा डब्बा भरणे , तयार करणे (तसाही सध्या हे काम त्याच्याकडेच आहे ) तिला शाळेत सोडणे  सगळं छान  केलं .

मला तसाही वाटत दोघे working  असतील तर नवऱ्याने घरकामात हातभार लावणे काही नवीन नाही . किंवा हातभार लावलाच पाहिजे . वेळ आणि सोय दोन्ही ची कमतरता असते .

परवा  असेच एका ठिकाणी गेलो होतो . म्हणाल तर तसे ते नवरा बायको working . माझी बहीण या नात्याने मी तिला बोलायचे आणि तीही बऱ्याच वेळा माझ्या मदतीला धावून आली होती ...
तिने मला सर्वप्रथम भरपूर रागावले आणि इन्सिस्ट केले कि तब्बेतीची काळजी घे आणि घरूनच काम कर. मला खूप बरे वाटले , कि कुणीतरी इतक्या काळजीपोटी बोलतीये .. नंतर म्हणाली कि तुझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घे ... I  रिअली surprised .. असो नंतर राहुल ला म्हणाली कि मला तुला फोन  करायला लाज वाटली .. कि कसा तू एकटा manage करत असशील ...
ह्यात लाज कसली वाटायला पाहिजे ? हाकेच्या अंतरावर राहते जर खरंच तळमळ वाटत असती तर कधी  जेवायला बोलावलं असत ... किंवा मुली सोबत खेळायला आली असती . आता खरं तर तीही working  वूमन आहे सो मला तशी खरंच अपेक्षा नाही पण लाज कसली वाटली ?

तसाही मी तमाम बायका वर्ग जो नवऱ्याला काहीच करू देत नाही फक्त त्याच स्वतःच ढुंगण धुणं  सोडल्यास .. अश्या बायकांचे कंमेंट्स तर मी इकडून ऐकून तिकडून सोडून दिलेच आहेत पण एक मुंबई मधली working  वूमन जी स्वतः १२ तास काम करते तिचा नवरा सुद्धा तिच्या मुलींकडे बघतो , सांभाळतो (now  I doubt ) तिने असे म्हणावे .... ?

डोक्याचा भुगा झाला विचार करून ... काय नेमकं चाललंय किंवा का नेहमी कामाचा संबंध gender शी लावला जातो ?
काही कामे खरंच वाटून घेतली तर काय होत? जेंव्हा बाई कामासाठी घराबाहेर पडते ते accept केलाच न , त्यात काय एवढं असं म्हणून ... त्याच पद्धतीने एका पुरुषाने त्याच लेकरू मी समर्थ पणे  सांभाळू शकतो असं म्हणतो तर का नाही म्हणायचं , त्यात काय एवढं ??
माझ्या बऱ्याच मैत्रिणी सुद्धा राहुल च कौतुक करतात ... पण मला एकही राहुल चा मित्र किंवा माझा मित्र असा नाही भेटला जो म्हणेल कि ग्रेट यार तू काम करतेस , चांगलं कमावतेस .... का नाही ?

मला निसर्गाचा नियम माहित आहे कि काही कामे फक्त बायकांनी करावीत , मुलांना जन्म देणे , मन लावून स्वयंपाक करणे, बायका multitasking असतात. मला मान्य आहे . पण पुरुषांना जर करावंस वाटत असेन तर का नाही स्वयंपाकात मदत करू द्यायची ? का नाही मुलांना सांभाळू द्यायचं ? वेळही असतो तेंव्हा.

हे जे कुणी पुरुषांना करू देत नसेल अर्थात त्यांची इच्छा असल्यास .. तर मी त्याला बायकी इगो म्हणेन ... संसारात काय जो काम करतो त्यालाच महत्व का ? आणि जर बायकांची कामे पुरुष सहज करू लागले तर बायकांना मोठेपणा गाजवायला साधन कुठलं राहणार नाही का ? आपलं क्रेडिट दुसऱ्या कुणाला कशाला द्यायचं ?  नाही का ?

मला क्रेडिट नकोच आहे पण मला guilt देऊ नका  एवढ माझं म्हणणं .

मुळात घरकाम किंवा स्वतःच काम करणे याचा डायरेक्ट संबंध मी स्वावलंबनाशी लावते. कुणाचं काही अडू नये म्हणून.
मला सुद्धा ४ गोष्टी यायलाच हव्यात जसेकी कार चालवणे, बल्ब बदलणे ... (मला अजून specific to  पुरुष अशी कामे सुचेचनात)
हीच बाब सर्वांसाठी सामान असायला हवी.

मी काही आळशी नाही , आणि मी नुसती बसून ए चल चहा टाक  रे असं म्हणणारी नाही. सोई  नुसार गरज पडल्यास नवऱ्याची मदत accept करणारी आहे . यात माझं बाईपण अज्जीबात कमी होत असं मला वाटत नाही तसेच माझ्या नवऱ्याचा पुरुषार्थ तसूभरही कमी होणार नाही

कालच Ki and Ka  पहिला. शेवटी जया बच्चन च पत्र सगळं सांगून जात. Ka मोठा झाला कारण Ki ने त्याला accept केलं. घर सांभाळणारा नवरा हे कुठली स्त्री सहज नाही स्वीकारू शकत.. ह्यासाठी सुद्धा खूप हिम्मत लागते ...

खरंच नाही का ?



1 comment: